Saturday, 29 March 2014

आठवत तुझ ते मिश्कील  हसणे, काळजाआड लपणे 
हळूच डोकावून बघणे , अन लांब केसाशी खेळणे 
सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे
सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे 
काय यालाच म्हणतात miss  करणे  

तू नसूनही तू आहे असे वाटणे 
मग सतत मागे वळून बघणे 
हळूच मनाला समजावणे 
अन जुन्या आठवणींत गुरफटणे  
काय यालाच म्हणतात miss  करणे 

तुही चंद्र बघत असशील ,म्हणून चंद्र बघणे 
चंद्राच्या निमित्ताने तुझा चेहरा न्याहाळणे 
टपोरे तुझ्या बोलक्या डोळ्यांशी  बोलणे
अन चटकन चंद्र अश्रूंमुळे पुसट होणे  
काय यालाच म्हणतात miss  करणे  

काय यालाच म्हणतात miss  करणे......
हेच असेल Miss करणे तर मी रोज करतो 
माझामध्ये मी तुलाच बघतो 
सातासमुद्रा पलीकडे आहे पण 
रोज एक समुद्र  पार करण्याचा प्रयत्न करतो 
कसे सांगू मी तुला रोजच Miss  करतो 

तुझा मिठीत येण्याचा ध्यास करतो  
कारण मी तुला रोजच Miss करतो......

No comments:

Post a Comment