Thursday, 26 July 2012

कॉलेजमध्ये आवडलेली मुलगी
शब्दांनी बरंच काही बोलून जाते...

पण शाळेत मनात घर करणारी"ती"
फक्त डोळ्यात पाहून रात्रन रात्र झुरायला लावते ..

तुझ्या मनात नव्हतो मी
एका क्षणात नव्हतो मी
मी आठवत होतो तुला
तुझ्या लक्षात नव्हतो मी
मी रोज पाहायचो तुला
तुला दीसत नव्हतो मी
मी व्यक्त झालो तेव्हा
तुला कळत नव्हतो मी
तु नाही म्हनालीस मला
तुझ्या मनात नव्हतो मी

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे
फ़ुलवायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
तुझे ते टपोरे घारे डोळे
व गुलाबासारखे गाल
तुझे ते ओठ नशिले
आणि मस्तानी चाल
फ़क्त माझ्याच या नजरेणे तुलाच बघायचे आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
तुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातल प्रत्येक स्वाद मलाच
चाखायचा आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
तुझे ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात मला पण झुलायचे
आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात तुझ्याच बरोबर
भिजायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे
फ़ुलवायच आहे.....