Saturday, 29 March 2014

पहिल्याच प्रेमाची पहिलीच वेळ,
मनातील भावनांचा मांडलेला खेळ,
जुळवत होत मन मनाशी मेळ,
पहिल्यांदाच...

तुझा तो FBवरचा पहिला HI,
offline जाण न म्हणताच bye,
बोलायची तू कशी अन काय ??
आठवत मला सर्व ....

वाटत होत तुही माझ्यावर प्रेम करते,
माझ्याइतकी तूही माझ्यावर मरते,
म्हणूनच तू अशी रोज chat करते,
किती वेडा होतो न मी !!!

माझ्यासारखे बरेच आहे असं जेव्हा कळल,
मन माझं सखे ग फार फार रडलं,
माझ्याशीच हे असं कस घडलं,
कळलच नाही !!!

अजूनही तू online असते,
बोलायचं तुझ्याशी अजूनही असते,
msgs तुझ्यासाठी आताही type  होते,
नकळतच !!!

फरक फक्त इतकाच आहे,
तुला send  मी ते करत नाही.
माझ्यामते याला अर्थ आता काही नाही,
कारण आता तू आधी सारखी तीच नाही,
अन मी सखे तुझ्यासारखा मुळीच नाही....

No comments:

Post a Comment