Saturday, 29 March 2014

धग उन्हाळी, भरल्या दुपारी 
सावली शोधणे, तुझ्या बरोबर,
बर्फ गोळा, चोखून पंचरंगी 
स्वप्ने पाहण, तुझ्या बरोबर !

थांबा उभा, गोठलेल्या पायांनी 
प्रतीक्षा बसची, तुझ्या बरोबर,
बिलगून भिजणे, पुन्हा बिलगणे 
एकाच छत्रीत, तुझ्या बरोबर !

हिवाळ्यात थंड, चादर धुक्याची
पहाटची रपेट, तुझ्या बरोबर,
चहा वाफाळलेला, दव थेंबाचा 
उब ओठांना, तुझ्या बरोबर !

धुराच्या वलया, सोबत उठलेले 
शब्द वादळ, तुझ्या बरोबर, 
क्षण क्षण, आठवतात केलेले 
व्यतीत सारे, तुझ्या बरोबर !

No comments:

Post a Comment