Saturday 29 March 2014

जिचे सुंदर असेल रूप,
आवडेल मला खूप ,
खुणवेल गुपचूप,
अशी हवी प्रियसी !

जिच्या गोंडस अश्या भावना,
सुखवील माझ्या मना,
अशी या सज्जना,
हवी प्रियसी !

जिचे नयन जणू हिरनिचे,
सौंदर्य फुलविल त्या तरुणीचे,
हेचि मागणे प्रभू चरणीचे,
अशी हवी प्रियसी !

जिला असेल माझा लळा,
वर्शवेल जी प्रेमाचा सडा ,
जिच्यासाठी जाणवेल कडकडा,
अशी हवी प्रियसी !

अश्या माझ्याची भावना,
आहे अपूर्ण तिच्याविना,
सांगा अशी या सज्जना,
मिळेल प्रियसी ??
का तुझ्यावाचून,
मला करमेना,
का तुझ्यावाचून,
मन माझे रमेना.....

का तुझ्यावाचून,
ध्यान कुठेच नसेना,
तुलाच शोधत असतो,
पण तु काही सापडेना.....

का तुझ्यावाचून,
चित्त माझे कशातचं
लागेना,
का तुझ्यावाचून,
काहीचं मला दिसेना.....

का तुझ्यावाचून,
मला दूर रहावेना,
काय करावे मी,
काहीच मला कळेना.....

का तुझ्यावाचून,
ह्रदय माझं धडकेना,
का तुझ्यावाचून,
कविता ही सुचेना.....

का तुझ्यावाचून,
श्वास घेता येईना,
का तुझ्यावाचून,
झोप मला लागेना.....

का तुझ्यावाचून,
रात्र माझी सरेना,
का तुझ्यावाचून,
दिवस माझा उजडेना.....

का तुझ्यावाचून,
दुपार माझी जायेना,
का तुझ्यावाचून,
कातरवेळ ढळेना.....

का तुझ्यावाचून,
ओठातून शब्द फुटेना,
का तुझ्यावाचून,
दुसरं काही आठवेना.....

का तुझ्यावाचून,
मन दुसरं काही मागेना,
का तुझ्यावाचून,
मला करमेना.....
सकाळी  मी  उठायचं  म्हटलं  की ,
तुला  मेसेज करण्याची आता  सवयचं  झालीय. .

दात  घासायचं  म्हटलं  की ,
कोलगेटची   आता  सवयचं  झालीय..

आंघोळ  करायची  म्हटलं  की ,
डेटालची  आता  सवयचं  झालीय. .

नाष्टा  करायचा  म्हटलं  की  ,
पोह्याची  आता  सवयचं  झालीय. .

ऑफिसाला  जायचं  म्हटलं  की ,
ट्रेनची  आता  सवयचं  झालीय. .

काम  करूनही   बोलण   खाण्याची  ,
बाॅसची  आता  सवयचं   झालीय. .

संध्याकाळी   घरी   आल्यावर  ,
तुझ्यासोबत फोन वर बोलण्याची सवयचं  झालीय. .


आयुष्यात  माझ्या  आता ,
तुझ्या  सोबतीची  सवयचं   झालीय. .

कारण  एकदा  सवय  झाली  की  ,
जीवन  जगणं  सोपं  नसत..

सवय  लावून , सवय  मोडनं खरंच  सोप  नसतं.........
कळत कसं नाही ग तुला,
मला हे कळत नाही,
वाटत कळत असूनही,
तुला का ते वळत नाही !!

मी वेडा प्रेमात तुझ्या बघ,
विसरलो या दिशा दाही,
हरदिन माझा शोधत तुझ्या अन,
विचारात हि रात जाई !!

होताहेत भास तुझे ग, 
दिसतेय मज तू ठायीठायी,
खरच तुझ्या सवे ग सखे,
घडतंय का असंच काही ??

का करतो मी प्रेम हे इतकं,
प्रश्न पडतो काही मलाही,
मग हे माझं उत्तर देत,
तू नाही तर काहीच नाही !!

आहे मी बेहाल राणी,
सांग ना तू उत्तर काही,
तुझ आपलं तेच असत,
कधी हो कधी नाही...
कधी हो !!! कधी नाही !!!
तु  बोलत  नाहीस  तेव्हा ,
मलाही  बोलावं  वाटत नाही

तु  हसत  नाही  तेव्हा ,
मलाही  हसावं  वाटत  नाही

तु  जेवत  नाही   तेव्हा  ,
मलाही  जेवावं  वाटत  नाही

तु  झोपत  नाही  तेव्हा ,
मलाही  झोपावं  वाटत  नाही

तु  जवळ  नाहीस  तेव्हा ,
मलाही  जगावं  वाटत  नाही
तिच्‍या त्‍या गुलाबी डोळ्यात,
एक वेगळीच धुंद नशा साठायची...
झाकताच नयन अन् माझे,
मनी माझ्या ती आठवायची...

तिच्‍या त्‍या नशिली ओठात,
गोडवा असा मधाळ असायचा...
स्‍पर्श करताच तिच्‍या ओठी,
अंतरंगात प्रेमाचा मोहर फुटायचा...

तिच्‍या त्‍या कुरळ्या केसात,
हलकासा सुगंध साठायचा...
जवळुन जाता ती माझ्या,
आसपास असलेली भासायचा...

तिच्‍या त्‍या पापण्‍याच्‍या अदा,
पाहताना मन गुंतायचा...
काय माहित मी पुन्‍हा,
स्‍वताःला त्‍यात गुंतायचा...
पहिल्याच प्रेमाची पहिलीच वेळ,
मनातील भावनांचा मांडलेला खेळ,
जुळवत होत मन मनाशी मेळ,
पहिल्यांदाच...

तुझा तो FBवरचा पहिला HI,
offline जाण न म्हणताच bye,
बोलायची तू कशी अन काय ??
आठवत मला सर्व ....

वाटत होत तुही माझ्यावर प्रेम करते,
माझ्याइतकी तूही माझ्यावर मरते,
म्हणूनच तू अशी रोज chat करते,
किती वेडा होतो न मी !!!

माझ्यासारखे बरेच आहे असं जेव्हा कळल,
मन माझं सखे ग फार फार रडलं,
माझ्याशीच हे असं कस घडलं,
कळलच नाही !!!

अजूनही तू online असते,
बोलायचं तुझ्याशी अजूनही असते,
msgs तुझ्यासाठी आताही type  होते,
नकळतच !!!

फरक फक्त इतकाच आहे,
तुला send  मी ते करत नाही.
माझ्यामते याला अर्थ आता काही नाही,
कारण आता तू आधी सारखी तीच नाही,
अन मी सखे तुझ्यासारखा मुळीच नाही....
तुझ्या माझ्या भेटीचे क्षण,
अजून आठवतं खुप मला...
हरवलो होतो भान सारे,
पाहताच समोर मी तुला...

अंगात घातलेला पंजाबी सूट,
खुप उठून शोभत होता तुला...
वाटत होते हद्यास माझ्या,
कवटाळून ठेवु या क्षणाला....

गजरा माळलेल्या केसात,
दरवळत होता सुगंध फुलाचा...
अन् हळूच जाणत होतो,
गंध तुझ्या माझ्या प्रितीचा...

हसताना गालावरच्या खळीत,
नकळत मन माझं फार गुतंलं...
 अन् तुझ्या या रुपाचा मोहात,
खोल-खोल डोहात संबंध बुडालं....!!


अश्विन आगरकर......
माहीत  नाही  मला
तुझं  खरं  प्रेम  असेल  का ?
पण  मी  मात्र  तुझ्यावर
मरमर  मरतो

माहित  नाही  मला
तुझं  खरं  प्रेम  असेल  का ?
पण  मी  मात्र  तुझ्यासाठी
दिवस रात्र  झुरतो

माहित  नाही  मला
तुझं  खरं  प्रेम  असेल  का ?
पण  मी मात्र तुझी  एक
झलक   पाहण्यासाठी  तडपडतो

माहीत   नाही   मला
तुझं   खरं   प्रेम  असेल  का  ?
पण   मी   मात्र  तुझा
आवाज  ऐकण्याठी   तळमळतो

माहीत   नाही   मला
तुझं  खरं  प्रेम  असेल  का  ?
पण   मी   मात्र  तुझ्या
हसण्याची  वाट   बघतो

माहीत   नाही   मला
तुझं   खरं   प्रेम  असेल  का  ?
पण   मी   मात्र  तुझ्यासाठी
देवाकडे  आयुष्य   मागतो. .......
तू आलीस वादळासारखी,
प्रेमाचा पाला-पाचोळा घेऊन 
अन गेलीस निघून!
तू आलीस वळवाच्या पावसासारखी,
प्रेमाचा शिडकावा करून,
अन गेलीस निघून!
तू आलीस वाऱ्यासारखी,
प्रेमाचा अलगद स्पर्श करून,
अन गेलीस निघून!
तू आलीस फुलासारखी,
प्रेमाचा सुगंध घेऊन 
अन गेलीस निघून!
तू आलीस विजेसारखी,
प्रेमाचा कड-कडात, लख-लखाट करून,
अन गेलीस निघून!
तू आलीस पावसासारखी,
प्रेमात चिंब भिजवून 
अन गेलीस निघून!
तू आलीस अळवावरच्या पाण्यासारखी,
प्रेमाचे थेंब टाकून,
अन गेलीस निघून!
तू आलीस डोळ्यातील अश्रूंसारखी,
प्रेमाचे अश्रू टाकून,
अन गेलीस निघून!
तू आलीस अन गेलीस निघून,
प्रेमाचे रोपटे लावण्यासाठी,
अशीच येत जा, अधून मधून,
गोरा गोरा रंग तुझा
उन्हामध्ये जाळू नको
उगाचच राणी अशी
रानोमाळी हिंडू नको

अनवाणी पाय तुझे
तापलेल्या भूमीवरी
पाहुनिया बसतात
चटकेच माझ्या उरी

फुलूनिया आले झाड
मोहरांनी गंध धुंद
झाडाखाली थांब जरा
विझू दे ग सारे अंग

जरा जरा वारा घे ग
अंगावरी पदरानी
तापलेले श्वास तुझे
निवो मंद झुळुकांनी

काय तुला सांगू आणि
काय करू कळेनाचि
तुझ्यासाठी करतो मी   
पायवाट काळजाची
हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..


प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
... माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..


डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता..


तो रुसलेला ओला रुमाल..
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता..


क्षणांत वाढणारे अंतर पण..
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता..


प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता..
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
 प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
कधीतरी   बागेत  भेटून  
आता  कंटाळा  आला
शेवटी   मी  तुला
दररोज  भेटायचं  ठरवलं

फोन  करून  बोलून
आता  कंटाळा  आला
शेवटी  मी  तुला
समोर   बोलायचं  ठरवलं

दुरूनच    बघून   तुला
आता  कंटाळा   आला
शेवटी   मी   तुला
मिठीत   घ्यायचं   ठरवलं

मिस    करून    तुला
आता   कंटाळा  आला
शेवटी   मी   तुला
मिसेस   करायचं  ठरवलं. ........
जरी असले हसरे चेहरे,
तरी दु:ख लपवतो मनी,
फार एकाकी जगतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

असतील लाखो चांदण्या,
या मन भुलवाया परी,
तरी एकटा जगतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

नको मज लाखो एक पाहिजे,
जी प्रेम खरे मज करी !!
अशी एक चांदणी शोधतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

दिसतील पास न असता साथ,
तरी आस हि आहे मनी,
म्हणूनच राती भटकतो आहे.
मज भेटेल कधीतर कुणी...
तिथे चंद्र आणि इथे मी...
तिथे चंद्र आणि इथे मी...
मिठीत तुझ्या समावून घे...!!
डोळ्यात वसलयं प्रेम माझं,
ईशारे माझे समजुन घे.....
शब्दात समावलयं प्रेम माझं,
नजरेचा तुझ्या होकार दे.....
ह्रदयात साठलयं प्रेम माझं,
मनात तुझ्या जपून घे.....
आठवणीत जपलयं प्रेम माझं,
ओँजळीत तुझ्या ठेवू दे.....
स्पर्शात लपलयं प्रेम माझं,
मिठीत तुझ्या समावून घे.....
आठवत तुझ ते मिश्कील  हसणे, काळजाआड लपणे 
हळूच डोकावून बघणे , अन लांब केसाशी खेळणे 
सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे
सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे 
काय यालाच म्हणतात miss  करणे  

तू नसूनही तू आहे असे वाटणे 
मग सतत मागे वळून बघणे 
हळूच मनाला समजावणे 
अन जुन्या आठवणींत गुरफटणे  
काय यालाच म्हणतात miss  करणे 

तुही चंद्र बघत असशील ,म्हणून चंद्र बघणे 
चंद्राच्या निमित्ताने तुझा चेहरा न्याहाळणे 
टपोरे तुझ्या बोलक्या डोळ्यांशी  बोलणे
अन चटकन चंद्र अश्रूंमुळे पुसट होणे  
काय यालाच म्हणतात miss  करणे  

काय यालाच म्हणतात miss  करणे......
हेच असेल Miss करणे तर मी रोज करतो 
माझामध्ये मी तुलाच बघतो 
सातासमुद्रा पलीकडे आहे पण 
रोज एक समुद्र  पार करण्याचा प्रयत्न करतो 
कसे सांगू मी तुला रोजच Miss  करतो 

तुझा मिठीत येण्याचा ध्यास करतो  
कारण मी तुला रोजच Miss करतो......
एक दिवस असं पण येईल,
माझ्या जगण्याच्या वाटेवर,
तु मला येऊन भेटशील...
अन् तुझं मन निरागसं करुन,
मनातील अबोल भावना सागंशील....

एक दिवस असं पण येईल,
तुझ्या हातात हात माझा,
अलगदपणे नकळत देशील...
अन् आयुष्याभर देईन साथ,
तुला असं मला बोलशील....

एक दिवस असं पण येईन,
त्या नीरव सागराच्या किनारी,
सोबत घेवुनी मला फिरवशील...
अन् माझ्या ओल्या आसवाना,
तु प्रेमानं त्याला पुसशील....

एक दिवसं असं पण येईल,
माझ्या गुलाबी ओठाना,
स्पर्शूनी चिबं तु भिजवशील...
प्रेमाचा असलेला नवा गंध,
माझ्या खाली हद्यात रुजवशील....!!