Thursday 26 July 2012

कॉलेजमध्ये आवडलेली मुलगी
शब्दांनी बरंच काही बोलून जाते...

पण शाळेत मनात घर करणारी"ती"
फक्त डोळ्यात पाहून रात्रन रात्र झुरायला लावते ..

तुझ्या मनात नव्हतो मी
एका क्षणात नव्हतो मी
मी आठवत होतो तुला
तुझ्या लक्षात नव्हतो मी
मी रोज पाहायचो तुला
तुला दीसत नव्हतो मी
मी व्यक्त झालो तेव्हा
तुला कळत नव्हतो मी
तु नाही म्हनालीस मला
तुझ्या मनात नव्हतो मी

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे
फ़ुलवायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
तुझे ते टपोरे घारे डोळे
व गुलाबासारखे गाल
तुझे ते ओठ नशिले
आणि मस्तानी चाल
फ़क्त माझ्याच या नजरेणे तुलाच बघायचे आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
तुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातल प्रत्येक स्वाद मलाच
चाखायचा आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
तुझे ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात मला पण झुलायचे
आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात तुझ्याच बरोबर
भिजायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम
करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे
फ़ुलवायच आहे.....

Saturday 16 June 2012


तो हातात गुलाब घेवून...,व्हेले ंटाईन डे च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो पुढे ... तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन.. ? ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून जाईन... तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि तू मला झिडकारतेस..., खरं सांग मला.., तू ही माझ्यावर प्रेम करतेस.. ? ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज असते....? माझे तूझ्यावर प्रेम असते तर.., तूला जायाला सांगीतले नसते..! तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस... ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस... ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत दिसते..., तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण येते.. तो - मग रोज घरी जाताना मागे का वळ्तेस.... ? सारखं मागे वळुन मला का पहातेस...? ती - मला मोकाट सोडलेल्या कुत्र्यांची खूप भिती वाटते.. म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते... तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान मी सहण करणार नाही.. , आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार नाही...! ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून आनंद झाला.., पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा... , आज वेळ कसा वाया गेला..?? तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते असलेली लिस्ट काढून ) ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे...या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे... आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार.. एक -दोघींचा तरी होकार मला नक्की मिळणार... ह्या दिवसाचा एक एक क्शण माझ्यासाठी अनमोल आहे.. तूझं माझ्यावर प्रेम आहे का....? या सर्वांना विचारायचं आहे...! ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल..., जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल... दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू लागतात... इतक्यात तिला आवाज येतो व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन...? आवाज देणारा तोच असतो.... खुप राग आला असताना ही ती नकळत तो जवळ येण्याची वाट पाहत थांबते.... जवळ येताच तो तिच्या हातावर नावांची यादि असलेला कागद ठेवतो.... ती कागद पहाते आणि अचंबित होते.... पुढे... ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त माझेच नाव आहे ....!!! मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे...? तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत आहेस.... मी फ़क्त तुझाच आहे ..., तुला एवढचं सांगायचं आहे .... चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू लागतो .. थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो .. व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन..?? तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने वळुन पाहतो.... ती पुन्हा मोठ्याने ओरडत त्याला विचारते ... व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन.... ?? ♥

Friday 20 April 2012

खरी माणसे हि जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाही ....................
ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात............
मी कधीच विसणार नाही....
तुझं ते हसणं,
तुझं ते शांत बसणं,
तुझं ते मंजुळ बोलणं,
मी कधीच विसणार नाही.....
तुझा निरागस स्वभाव,
तुझ्या डोळ्यांचे बोलाकेपण,
तुझं तेवढंच शांत मन,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझे ते रागाने लाल झालेले गाल,
तुझं ते नाक मुरडणं,
तुझं ते गाल फुगवणं,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझी ती खट्याल नजर, तुझं ते ईश्श म्हननं,
तुझं ते गोड लाजनं,
मी कधीच विसरणार नाही..... कधीच नाही....
जाताना ती म्हणाली
घट्ट मिठी मारून जा....
स्वप्नातलं आयुष्य मला
आंदण म्हणून देऊन जा,

मी म्हणालो..
चिंता करू नकोस
जीवनाच्या एका वळणावर
आपण पुन्हा एकदा भेटूया,

स्वप्नाताला संसार आपण
प्रत्यक्षात थाटूया.......

Saturday 14 April 2012

यु तेरा मुस्कुराना
और आके चले जाना
किस्मत का है खुल जाना
यु तेरा दिदार हुआ
पेहलासा प्यार हुआ
पेहली हि बार हुआ इस दिल को
नातो इकरार हुआ
नाही इनकार हुआ
जाने क्या यार हुआ इस दिल को

Sunday 8 April 2012

हळुवार बोचणाऱ्या ..
अंगावर शहारे आणणाऱ्या गुलाबी थंडीत ..
माझ्या खांद्यावर डोके ठेवून ...
तासंतास गप्पा मारायाचीस ..
मुसळधार पावसात ...
माझ्यासाठी किती वेळ एकटीच ...
उभी राहिचीस ...
आणि मी आल्यावर त्या पावसाला हि न जुमानता ..
अंग ओलेचिंब होईपर्यंत ...
माझ्यासोबत भिजयाचीस ...!
अन ..मी आज रखरखत्या उन्हात ...
सोडून गेलो तुला ...
तुझा हात सोडून .. अर्ध्या वाटेवरून ..
तुला कारणही ठाऊक होतं ..
पण ,..तरीही रागावली असशील ना ..?

तुझा रागही फसवा ..तुझ्यासारखाच ..
आता संपलंय सर्व ...
आपल्यातले ऋणानुबंध ..
असं कितीदा तरी बोलून ..
अबोल्यानंतर च्या पहिल्याच भेटीत ..
हसरी शब्द उधळणारी ..
सहजच बोलतेय असं दाखवणारी ...
आपल्या बहार कळ्या स्वतःच खुडताना ..
आपण आपला प्राणच खुडतो ..
हे कळत नाही का मला ..?

मी समोर आल्यावर प्रत्येकवेळी ..
उध्वस्त होणारं तुझं स्वप्नाचं घर ..
दिसतं ग मलाही ..
त्या घराचे सुंदर अवशेष ..
जीवापाड जपलेत मी ...
आजही ...
डोळ्यातून येणारे अश्रू दिसु नयेत म्हणून ...
खूप खूप हसतो ..आनंदी राहतो ..
ते जाऊ दे ...
अजूनही तशीच स्वप्नं पाहतेस का गं ..
भविष्याची ...?
तुझ्या स्वप्नील डोळ्यांचा ..
आणि त्या सोनामोहारच्या फुलांचा सडा..
अजूनही तसाच सांडतो का गं पायवाटेवर ..
त्या फुलांना हात घेऊन चालायची माझी सवय ..
पण आता नाही घेत ..हातात ..
उगीच तू आठवयचीस ...
अजूनही ...!

आता कोणाशी बोलतेस .
मनातलं ..अगदी आतलं ..
कि बोलतच नाहीस ..?
अरे..हो तुझी एक महत्वाची गोष्ट ...
राहून गेलीये माझेकडे ..नजरचुकीने ..
खूप शोधाशोध केली असशील तू ..
पण ..नसेल सापडली तुला ...
वेळ मिळाला कि घेऊन जा ...!

मोडलेलं असलं तरी " मनच " ते ..
घेऊन जा आठवणीने ..
तुझ्या हि नकळत माझ्याकडेच राहून गेलंय ते ....

Wednesday 4 April 2012

"कोडे मनाचे न उलगडणारे कोणी...
स्वप्नांतारीचे राहिले जतुनी जीवनी ...
का कळेना ओढ वाटे कुणाची...
कळत असूनही न उमगले कोणी..."
"जर मी चुकलो ....... 
तर बरोबर करायला तुझा हाथ हवा आहे, जर मी हरलो .......... 
तर मला प्रेरणा द्यायला, मार्गदर्शन करायला तुझा हाथ हवा आहे, आणि जर मी मेलो ........ 
तरी सुद्धा माझे डोळे बंद करायला मला तुझा हाथ हवा आहे"

Thursday 29 March 2012

माझ्या जीवनात फक्त दोनच काम अशक्य आहे,
एक तिला मिळवणं आणि तिच्या शिवाय राहणं...

Tuesday 27 March 2012

भेट तुझी स्मरताना
भेट तुझी स्मरताना तो क्षण हवासा वाटतो.
न कळत येणाऱ्या आठवणींना , हेहसू आवरेनासं होतं.
अबोल माझ्या ओठांना, तुझ्या ओठांनी चव दिली.
एकाच ठिकाणी तासंनतास बोलण्याची सवय लावली.
विषयाचं ताळ तंत्र दोघांनाही नाही.
काहीही बोलत असतो. जे दोघांनाही पटत नाही.
भेट तुझी स्मरताना
त्या आठवणीत रमून जावसं वाटतं
तासंन तास तुझ्या मिठीत स्वतःला जखडून घ्यावसं वाटतं.
चुंबनाच्या स्पर्शाने, तुला रोमांचित करावसं वाटतं.
अंग अंग शहारुन, तुला वेडां पिसं करावसं वाटतं.
प्रत्येक भेटीत तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
भरभरून मिळालं प्रेम, तरी ते कमीच वाटतं.
भूक माझी भरपूर आहे असं नेहमी तुला वाटतं.
भेट तुझी स्मरताना
नव्याने भेटण्याची इच्छा होते.
तुझ्या प्रेमाची जादू
मला वेड पिस करते.
निरागस तुझं हास्यं, एकटक पहावसं वाटतं
भेट तुझी स्मरताना
आठवणींची दृष्ट काढावी वाटतं.
कुणाचीही नजर न लागता
तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
शेवटचा श्वासापर्यंत तुझ्यावर फक्त तुझ्यावरच
भरभरून प्रेम करावस

Friday 24 February 2012

सागरांच्या लाटांसारख्या तुझ्या आठवणी येतात,
माझ्या मनाला सामावून पुन्हा तुझ्याच कडे नेतात...

Thursday 23 February 2012

देवा तिला एव्हडच सांग......
मी जगलो फक्त तिच्याच साठी..
आणि मारतोय पण तिच्याच साठी..
तिच्या साठीच मी व्यसने सोडली..
अन जीवनाची पण रेघ मोडली....
... तिला बघूनच मी जगत होतो..
तिच्या साठीच झुरत होतो..
तू अस का केलास ग प्रिये..
का मला छाळालीस..
मी खोटा कधीच नव्हतो...ग
तुझा तो मित्रच ढोंगी होता..ग
तुला त्रास द्यायचा मला नव्हताच..
फक्त मला बोलायचं होत..
आणि त्याच एकूण तू मलाच झापलं..
अन माझ हृदय धारदार सुऱ्यान कापलं..
एव्हडा काय ग माझा गुन्हा..
आणि एवढीच माझी चूक
तुझ्या प्रेमाची लागली होती भूक
जातोय मी ग तुला सोडून..
तुझ्या सोबतची सर्व नाती तोडून..
फक्त एकदाच ग एकदाच म्हण..न
कि तुला पण मी आवडत होतो..
तुझ पण माझ्यावर प्रेम होत..
देवा तिला एव्हडाच सांग ..
मी जगलो फक्त तिच्याच
साठी आणि मारतोय पण तिच्याच
साठी.....
तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..

Wednesday 22 February 2012

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं वेड्यासारखंच वागतात

यात काही चुकीचं नाही सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार 'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.
जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...!
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलं
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं
त्यावर ती म्हणते कशी,
"बारा महिने एकत्र भिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या, आता नविन ब्वायफ्रेंड,
नविन वर्ष नाही का आलं?"
मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं!!
जगाच्या दूर ,
एका प्रेम नगरीत ,
आपल छोट स एक घर
असाव ,
अस माझ प्रेम असाव ...
... तू माझी रोज वाट पहावी ,
आणि मी हळूच येवून ,
तुला मिठीत घ्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
मी उशिरा का आलो म्हणून
रुसाव , मी मग तास न तास
तुला मनावाव,
आणि मग हळूच तू हसून
द्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
प्रेमाच्या नभा खाली , प्रेमाच्या धर्तीवर ,
प्रेमात रंगलेलो फक्त दोघे
असावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
प्रेमाच्या वर्षेत ,
चीम्भं भिजून , दोघे आनंदात गाणे गावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
तुला उदास बघून ,
माझे अश्रू पहिले
निघावेत ,
अस माझ प्रेम असाव ... जीवनाच्या प्रत्येक
क्षणात ,
तुझ्या सुखासाठी मी झटाव,
अस माझ प्रेम असाव ...
आपल्या चहू बाजूनी प्रेम ,
प्रेम आणि फक्त प्रेमाचा वास असावा ,
अशी ती नागरी असावी ,
अस माझ प्रेम
असाव ...