Friday 24 February 2012

सागरांच्या लाटांसारख्या तुझ्या आठवणी येतात,
माझ्या मनाला सामावून पुन्हा तुझ्याच कडे नेतात...

Thursday 23 February 2012

देवा तिला एव्हडच सांग......
मी जगलो फक्त तिच्याच साठी..
आणि मारतोय पण तिच्याच साठी..
तिच्या साठीच मी व्यसने सोडली..
अन जीवनाची पण रेघ मोडली....
... तिला बघूनच मी जगत होतो..
तिच्या साठीच झुरत होतो..
तू अस का केलास ग प्रिये..
का मला छाळालीस..
मी खोटा कधीच नव्हतो...ग
तुझा तो मित्रच ढोंगी होता..ग
तुला त्रास द्यायचा मला नव्हताच..
फक्त मला बोलायचं होत..
आणि त्याच एकूण तू मलाच झापलं..
अन माझ हृदय धारदार सुऱ्यान कापलं..
एव्हडा काय ग माझा गुन्हा..
आणि एवढीच माझी चूक
तुझ्या प्रेमाची लागली होती भूक
जातोय मी ग तुला सोडून..
तुझ्या सोबतची सर्व नाती तोडून..
फक्त एकदाच ग एकदाच म्हण..न
कि तुला पण मी आवडत होतो..
तुझ पण माझ्यावर प्रेम होत..
देवा तिला एव्हडाच सांग ..
मी जगलो फक्त तिच्याच
साठी आणि मारतोय पण तिच्याच
साठी.....
तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..

Wednesday 22 February 2012

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं वेड्यासारखंच वागतात

यात काही चुकीचं नाही सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार 'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.
जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...!
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलं
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं
त्यावर ती म्हणते कशी,
"बारा महिने एकत्र भिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या, आता नविन ब्वायफ्रेंड,
नविन वर्ष नाही का आलं?"
मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं!!
जगाच्या दूर ,
एका प्रेम नगरीत ,
आपल छोट स एक घर
असाव ,
अस माझ प्रेम असाव ...
... तू माझी रोज वाट पहावी ,
आणि मी हळूच येवून ,
तुला मिठीत घ्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
मी उशिरा का आलो म्हणून
रुसाव , मी मग तास न तास
तुला मनावाव,
आणि मग हळूच तू हसून
द्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
प्रेमाच्या नभा खाली , प्रेमाच्या धर्तीवर ,
प्रेमात रंगलेलो फक्त दोघे
असावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
प्रेमाच्या वर्षेत ,
चीम्भं भिजून , दोघे आनंदात गाणे गावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
तुला उदास बघून ,
माझे अश्रू पहिले
निघावेत ,
अस माझ प्रेम असाव ... जीवनाच्या प्रत्येक
क्षणात ,
तुझ्या सुखासाठी मी झटाव,
अस माझ प्रेम असाव ...
आपल्या चहू बाजूनी प्रेम ,
प्रेम आणि फक्त प्रेमाचा वास असावा ,
अशी ती नागरी असावी ,
अस माझ प्रेम
असाव ...