Sunday, 8 April 2012

हळुवार बोचणाऱ्या ..
अंगावर शहारे आणणाऱ्या गुलाबी थंडीत ..
माझ्या खांद्यावर डोके ठेवून ...
तासंतास गप्पा मारायाचीस ..
मुसळधार पावसात ...
माझ्यासाठी किती वेळ एकटीच ...
उभी राहिचीस ...
आणि मी आल्यावर त्या पावसाला हि न जुमानता ..
अंग ओलेचिंब होईपर्यंत ...
माझ्यासोबत भिजयाचीस ...!
अन ..मी आज रखरखत्या उन्हात ...
सोडून गेलो तुला ...
तुझा हात सोडून .. अर्ध्या वाटेवरून ..
तुला कारणही ठाऊक होतं ..
पण ,..तरीही रागावली असशील ना ..?

तुझा रागही फसवा ..तुझ्यासारखाच ..
आता संपलंय सर्व ...
आपल्यातले ऋणानुबंध ..
असं कितीदा तरी बोलून ..
अबोल्यानंतर च्या पहिल्याच भेटीत ..
हसरी शब्द उधळणारी ..
सहजच बोलतेय असं दाखवणारी ...
आपल्या बहार कळ्या स्वतःच खुडताना ..
आपण आपला प्राणच खुडतो ..
हे कळत नाही का मला ..?

मी समोर आल्यावर प्रत्येकवेळी ..
उध्वस्त होणारं तुझं स्वप्नाचं घर ..
दिसतं ग मलाही ..
त्या घराचे सुंदर अवशेष ..
जीवापाड जपलेत मी ...
आजही ...
डोळ्यातून येणारे अश्रू दिसु नयेत म्हणून ...
खूप खूप हसतो ..आनंदी राहतो ..
ते जाऊ दे ...
अजूनही तशीच स्वप्नं पाहतेस का गं ..
भविष्याची ...?
तुझ्या स्वप्नील डोळ्यांचा ..
आणि त्या सोनामोहारच्या फुलांचा सडा..
अजूनही तसाच सांडतो का गं पायवाटेवर ..
त्या फुलांना हात घेऊन चालायची माझी सवय ..
पण आता नाही घेत ..हातात ..
उगीच तू आठवयचीस ...
अजूनही ...!

आता कोणाशी बोलतेस .
मनातलं ..अगदी आतलं ..
कि बोलतच नाहीस ..?
अरे..हो तुझी एक महत्वाची गोष्ट ...
राहून गेलीये माझेकडे ..नजरचुकीने ..
खूप शोधाशोध केली असशील तू ..
पण ..नसेल सापडली तुला ...
वेळ मिळाला कि घेऊन जा ...!

मोडलेलं असलं तरी " मनच " ते ..
घेऊन जा आठवणीने ..
तुझ्या हि नकळत माझ्याकडेच राहून गेलंय ते ....

No comments:

Post a Comment